Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:9
15 Iomraidhean Croise  

त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.”


आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.”


तो धूर्तांचे बेत निष्फळ करतो, त्यामुळे त्यांच्या हातून काही कार्यसिद्धी होत नाही.


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत. पण विश्वासघातक्याचे शब्द तो व्यर्थ करतो.


तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan