Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:7
29 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.


ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले.


महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;


कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.


हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”


आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला.


ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले; तो कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते.


त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ.


आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्‍या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.”


हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.


तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;


नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलाची अप्रतिष्ठा करीन, ह्या अटीवर मी तुमच्याशी करार करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan