Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्‍यांसमोर तुला संताप आणला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयांदेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:5
14 Iomraidhean Croise  

तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन;


ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले; तो कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते.


त्याच्या वाडवडिलांच्या अनीतीचे परमेश्वराला स्मरण राहो; त्याच्या आईचे पातक काढून टाकले न जावो.


हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.


माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.


हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीचावस्था पावला आहे; त्यांना तू क्षमा करूच नकोस.


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.


त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”


आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले; त्याची ‘फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan