Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याकाळात आमच्यापैकी कोणीही, मी किंवा माझे बांधव, माझी माणसे किंवा माझ्याबरोबर असणारे पहारेकरी, कोणीही आपले कपडे बदलले नाहीत आणि जलाशयाला जाते वेळी देखील आम्ही आमची शस्त्रे नेहमीच आमच्याबरोबर बाळगत असू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:23
8 Iomraidhean Croise  

त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्‍हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.”


तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहूदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली.


मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते.


तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.


ते एकमेकांना रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यांतून पार जातात.


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजानन वेशींवर चालून गेले.


तेव्हा तो आपल्याबरोबरच्या लोकांसह सलमोन डोंगरावर गेला; हातात कुर्‍हाड घेऊन त्याने झाडाची फांदी तोडली व ती उचलून आपल्या खांद्यावर घेतली आणि तो आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला, “मी जे करताना तुम्ही पाहिले तेच तुम्हीही लवकर करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan