Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आम्ही कोटाची पुन्हा बांधणी करीत आहोत, हे सनबल्लटाला समजले, तेव्हा तो संतापला आणि अत्यंत कृद्ध झाला. त्याने यहूदी लोकांचा उपहास केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:1
13 Iomraidhean Croise  

मुख्य याजक एल्याशीब ह्याचा पुत्र योयादा ह्याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी ह्याचा जावई होता; मी त्याला आपल्याजवळून हाकून लावले.


कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.


हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”


अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्न दिवसांच्या आत कोट बांधून झाला.


आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्‍या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.


सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”


तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले.


काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.


तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan