Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 (नथीनीम हे ओफेलात, पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी (नथीमीम) यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 ओफेलमध्ये राहणार्‍या मंदिराच्या सेवकांनी पूर्वेकडील पाण्याच्या वेशीपर्यंत कोटाची दुरुस्ती केली आणि बुरुजाचा पुढे आलेला भागही दुरुस्त केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:26
13 Iomraidhean Croise  

जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.


त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले.


ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्‍चिमेस खोर्‍यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले.


अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथीनीम ह्यांनी आणि देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यांना अक्कल व समज होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्यासह


पण नथीनीम ओफेलात राहत; सीहा व गिश्पा हे नथीनीमांवर नेमले होते.


ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्‍यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.


पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोर ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली.


मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”


मग लोकांनी बाहेर जाऊन डाहळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणांत, देवाच्या मंदिराच्या अंगणांत, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले.


त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला.


कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan