Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याच्यानंतर बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबूक ह्याने डागडुजी केली; ती त्याने दाविदाच्या थडग्यासमोर, तेथे केलेल्या तळ्यापर्यंत, वीरगृह नामक ठिकाणापर्यत केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 अजबूकचा पुत्र नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथ-सूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:16
18 Iomraidhean Croise  

हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?


शम्मयाचा पुत्र मावोन; मावोन बेथसूराचा बाप.


बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,


दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मूठमाती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तर्‍हेतर्‍हेचे मसाले ह्यांनी भरलेल्या बिछान्यावर त्याला त्यांनी निजवले व त्याच्याप्रीत्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली.


मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती.


त्याच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लूम बिन हल्लोहेश व त्याच्या कन्या ह्यांनी डागडुजी केली.


उकिरडावेशीची डागडुजी बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मल्कीया बिन रेखाब ह्याने केली; त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले.


त्याच्यानंतर लेव्यांपैकी रहूम बिन बानी ह्याने डागडुजी केली. त्याच्याजवळच कईला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या ह्याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली.


त्यांच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर ह्याने डागडुजी केली.


वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करवले;


पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.


जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींच्या मध्ये हौद केला; पण ज्याने हे सर्व केले त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही; ज्याने हे पूर्वीच योजले त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावली नाही.


तुम्ही दाविदाच्या नगरीची भगदाडे पाहिली ती पुष्कळ होती; तेव्हा तुम्ही खालील तळ्यात पाण्याचा संचय केला.


तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा;


बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.


हल्हूल, बेथ-सूर, गदोर;


Lean sinn:

Sanasan


Sanasan