नहेम्या 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली. Faic an caibideil |