Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 2:3
21 Iomraidhean Croise  

तेव्हा बथशेबेने भूमीपर्यंत लवून राजाला मुजरा करून म्हटले, “माझे स्वामीराज दावीद चिरायू होवोत.”


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.


तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांना अप्रिय होऊन मरण पावला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यांत दिली नाही.


आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला यरुशलेम नगरात मूठमाती दिली; पण त्याला इस्राएलाच्या राजांच्या कबरस्तानात नेले नाही; मग त्याचा पुत्र हिज्कीया हा त्याच्या जागी राजा झाला.


हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीद वंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर ह्यांनी त्याच्यासंबंधाने आदर व्यक्‍त केला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.


खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथील वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.


त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.”


मी रात्री खोरेवेशीने बाहेर पडून अजगराच्या झर्‍याकडे, व उकिरडावेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली.


माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?”


तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.


राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील;


जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.


माझ्या कंबरेला दाह सुटला आहे; माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही.


पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”


ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू व्हा.


राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका.


दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.


मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा.


मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan