Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पण मी त्यांना असे म्हणालो “स्वर्गातील देवच आम्हास यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. पण यरूशलेमात तुमचा काहीएक अधिकार, वाटा व ऐतिहासीक हक्क नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 पण मी उत्तर दिले, “स्वर्गाचे परमेश्वर आम्हाला यश देतील. आम्ही त्यांचे सेवक या तटाची पुनर्बांधणी करू, परंतु यरुशलेममध्ये वा त्यातील ऐतिहासिक कार्यात तुमचा काहीही सहभाग व अधिकार असणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 2:20
21 Iomraidhean Croise  

देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्‍या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले.


पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”


हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,


राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,


“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”


त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.


यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.


तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो.


माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.


तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ;


अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील.


ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.


त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.


मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल.


तो मुकुट हेलेम,2 तोबीया, यदया व सफन्याचा पुत्र हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल.


आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan