Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 पण होरोनी सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीयाह आणि गेशेम अरबी यांनी आमच्या या योजनेबद्दल ऐकले, तेव्हा ते आमची थट्टा व उपहास करून म्हणाले, “हे तुम्ही काय करीत आहात? राजाविरुद्ध बंड करता काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 2:19
22 Iomraidhean Croise  

मुख्य याजक एल्याशीब ह्याचा पुत्र योयादा ह्याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी ह्याचा जावई होता; मी त्याला आपल्याजवळून हाकून लावले.


कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.


आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला.


त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, “निरनिराळ्या राष्ट्रांत अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहूदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे म्हणून तू हा कोट बांधत आहेस; ह्या अफवेवरून असे दिसते की, तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस.


आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर.


“असे असूनही आता जे माझ्याहून अल्प वयाचे आहेत, ज्यांच्या वडिलांची लायकी माझ्या मेंढ्याबकर्‍या राखण्यास कुत्रे म्हणून ठेवण्याचीही मी समजत नसे, ते माझी टवाळी करतात;


सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.


आम्ही आमच्या शेजार्‍यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.


तू आम्हांला आमच्या शेजार्‍यांच्या कलहास कारण करतोस; आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात.


हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


मी म्हणतो, तुझा युद्धसंकल्प व तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत; तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर?


कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.


तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.


“वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.


तेव्हा ते त्याला हसू लागले; पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले, आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.


आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”


ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.”


हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan