Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 पुढे आम्ही झर्‍याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 2:14
7 Iomraidhean Croise  

एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.


हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?


ह्याच हिज्कीयाने गीहोन नावाचा वरचा पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्‍चिमेकडे नीट खाली आणले. हिज्कीया आपल्या सर्व कार्यांत यशस्वी झाला.


ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्‍यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.


झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला.


त्याच्यानंतर बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबूक ह्याने डागडुजी केली; ती त्याने दाविदाच्या थडग्यासमोर, तेथे केलेल्या तळ्यापर्यंत, वीरगृह नामक ठिकाणापर्यत केली.


वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करवले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan