Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:23
16 Iomraidhean Croise  

शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले.


मग एज्रा याजक उभा राहून त्यांना म्हणाला, ”तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्राएलाच्या अपराधांत भर घातली,


ह्या सर्वांनी परदेशीय बायका केल्या होत्या; आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या पोटी त्यांना मुले झाली होती.


आम्ही आमच्या मुली ह्या देशातल्या लोकांना देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलांना करणार नाही;


ह्या देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू अथवा अन्नसामग्री विकण्यास आणली, तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही; सातव्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ.


त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांना वाचून दाखवण्यात आला; त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मवाबी ह्यांना देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे;


त्यांची मुलेबाळे अर्धवट अश्दोदी भाषा बोलत, त्यांना यहूदी भाषा बोलता येत नसे, ते आपापल्या जातींची मिश्र भाषा बोलत.


तुमचे ऐकून आम्ही अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आमच्या देवाचे अपराधी व्हावे व घोर पातक करावे काय?”


यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;


मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो.


तुम्ही विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?


जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;


त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या; एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे दहा वर्षे राहिले.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan