Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आमच्यावर व ह्या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र न मानून इस्राएलावर आणखी अरिष्ट आणायला पाहता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:18
16 Iomraidhean Croise  

ह्याशिवाय आम्ही असा एक नियम करून ठेवतो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी एक तृतीयांश शेकेल दर वर्षी द्यावा;


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाहीत; म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे हे आज दिसतच आहे.”


यहूदा देशात व यरुशलेमेच्या आळ्याआळ्यांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया ह्यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये, ह्यांचा तुम्हांला विसर पडला काय?


ते तुझी वस्त्रे हरण करतील, तुझे उत्कृष्ट जवाहीर हिसकावून घेतील.


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan