नहेम्या 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवसांत यहूदात काही लोक शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादत; त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ ह्यांचे बोजे शब्बाथ दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली त्याच दिवशी त्यांची मी कानउघाडणी केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला. Faic an caibideil |