नहेम्या 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया ह्यांना भांडारावर भांडारी नेमले; त्यांच्या हाताखाली हनान बिन जक्कूर बिन मत्तन्या हा होता; हे भरवशाचे होते; त्यांच्या भाऊबंदांना वाटे करून देण्याचे काम मी त्यांच्याकडे सोपवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली. Faic an caibideil |