Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मला आणखी असे कळले की लेव्यांना वाटे न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतांवर पळून गेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मला असेही समजले की, लेव्यांना जो हिस्सा नेमून दिला होता, तो त्यांना देण्यात आला नव्हता आणि यामुळे ते सर्व लेवी व ज्यांची उपासना घेण्याची जबाबदारी होती, ते संगीतकार आपआपल्या शेतांवर परत निघून गेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:10
11 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी ह्यांना मनापासून आपली कामे करता यावीत म्हणून त्यांचा भाग त्यांना द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणार्‍या लोकांना केली.


आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.


इस्राएल लोक व लेव्यांचे वंशज ह्यांनी धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्रस्थानाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठड्यांत आणावे; आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये.


जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.


तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.


मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.


“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्‍या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत.


तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लेव्याला सोडता कामा नये, हे लक्षात ठेव.


Lean sinn:

Sanasan


Sanasan