Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांना वाचून दाखवण्यात आला; त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मवाबी ह्यांना देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:1
22 Iomraidhean Croise  

यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.


त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले;


कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.


हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”


त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.”


तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने नियमशास्त्राचा ग्रंथ आणला.


ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर (तीन तास) आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले, व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले.


परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा; ह्या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही; कोणी जोडप्यावाचून असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्याच्या श्वासाने त्यांना एकत्र केले आहे.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत;


त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?”


तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”


कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan