Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 12:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला. आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 12:47
14 Iomraidhean Croise  

त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.


त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”


जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


कारण त्यांच्यासंबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणार्‍यांची व्यवस्था ठरली होती.


शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे : सराया, यिर्मया, एज्रा,


योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे : सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या,


हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.


ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.


त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा; पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan