नहेम्या 12:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते. Faic an caibideil |