Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 12:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग याजक व लेवी ह्यांनी स्वतःस शुद्ध करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत:चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरूशलेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 प्रथम याजक व लेवींनी स्वतःला शुद्ध करून घेतले. नंतर त्यांनी लोकांना, तटाला आणि वेशींना शुद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 12:30
14 Iomraidhean Croise  

मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला.


ह्यावरून याजक व लेवी हे इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा कोश घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले.


पण याजकांची संख्या फार थोडी असल्यामुळे त्या सर्व होमबलींची कातडी काढता येईना म्हणून काम समाप्त होईपर्यंत व याजक आपणांस पवित्र करीपर्यंत त्यांचे बांधव लेवी ह्यांनी त्यांना मदत केली; कारण आपणांस पवित्र करण्याच्या कामी याजकांपेक्षा लेवी विशेष सात्त्विक मनाचे होते.


आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा.


बंदिवासातून परत आलेल्या इस्राएल लोकांनी आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या भजनी लागण्यासाठी जे सर्व लोक त्या देशाच्या मूर्तिपूजक लोकांच्या अशुद्धतेपासून दूर राहिले होते त्या सर्वांनी भोजन केले.


बेथ-गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकत्र झाले; त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसवली होती.


मग मी लेव्यांना आज्ञा केली की, ‘शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा.’ हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या ह्याही कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर.


ह्या प्रकारे मी त्यांना सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली;


हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” असा ईयोबाचा नित्यक्रम असे.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.


त्याने लोकांना सांगितले की, तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्रीस्पर्श करू नका.


प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत.


आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan