Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 12:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मत्तन्याह, बकबुकियाह, ओबद्याह, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाल दरवाजांजवळ असलेल्या कोठारांचे संरक्षण करीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 12:25
10 Iomraidhean Croise  

त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”


परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.


द्वारपाळांचे वर्ग ह्या मुख्य पुरुषांतले होते; आपल्या भाऊबंदांबरोबर तेही परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत.


दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद-अदोम ह्याच्या नावाची निघाली, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली.


पूर्वेच्या बाजूस सहा लेवी, उत्तरेस रोजचे चार व दक्षिणेस रोजचे चार व भांडारगृहावर दोन-दोन असे नेमले.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


तो सिंहनाद करून म्हणाला, “प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan