Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यरुशलेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत; पण इस्राएल लोक, याजक, लेवी, नथीनीम व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यरुशलेमेत व यहूदातील आपापल्या नगरांत व वतनांत राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे प्रांताचे अधिकारी यरूशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यरुशलेमला येणार्‍या प्रांताधिकार्‍यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:3
14 Iomraidhean Croise  

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे :


नथीनीमांपैकी : सीहाचे वंशज, हसूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,


ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.


वरकड इस्राएल लोक, याजक व लेवी यहूदाच्या सर्व नगरांत आपापल्या वतनात होते;


यरुशलेमेत काही यहूदी व काही बन्यामिनी राहत होते. यहूदाचे वंशज हे : पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जीया बिन जखर्‍या बिन अमर्‍या बिन शफाट्या बिन महललेल;


याजक : यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.


लेवी : येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्‍याहत्तर.


नथीनीम : सीहाचे वंशज, हशूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,


बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यांतले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुशलेमेस व यहूदातील आपापल्या नगरांत परत गेले ते हे :


येशूवा, नहेम्या, अजर्‍या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम, व बाना. जे जरूब्बाबेलबरोबर आले ते हेच. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची संख्या ही होती :


ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan