Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:22
19 Iomraidhean Croise  

मफीबोशेथास मीखा नावाचा एक लहान पुत्र होता. सीबाच्या घरी राहणारे सर्व जण मफीबोशेथाचे चाकर होते.


हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले.


मीखा, रहोब, हशब्या,


होदीया, बानी, बनीनू;


सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;


आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता.


ह्यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता, आणि हसनूवाचा पुत्र यहूदा नगराचा दुय्यम अधिकारी होता.


व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्‍या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,


आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.


प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ ह्यांच्या दिवसांत एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे ह्यांची योजना केली होती.


आणि मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया ह्यांना भांडारावर भांडारी नेमले; त्यांच्या हाताखाली हनान बिन जक्कूर बिन मत्तन्या हा होता; हे भरवशाचे होते; त्यांच्या भाऊबंदांना वाटे करून देण्याचे काम मी त्यांच्याकडे सोपवले.


त्याच्यानंतर लेव्यांपैकी रहूम बिन बानी ह्याने डागडुजी केली. त्याच्याजवळच कईला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या ह्याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालनपोषण तुम्ही करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan