Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्‍याऐंशी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 या पवित्र नगरात दोनशे चौऱ्याऐंशी लेवी राहायला गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 पवित्र शहरामधील सर्व लेवी एकूण 284.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:18
10 Iomraidhean Croise  

तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमेप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन.”


लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.


आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.


द्वारपाळ अक्कूब व तल्मोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),


आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.


मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan