Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएली लोकांचे नेते जे यरूशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी दहातल्या एकाने पवित्र यरूशलेम नगर येथे रहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:1
21 Iomraidhean Croise  

त्यांतल्या लहानथोरांनी आपापल्या पितृकुळांप्रमाणे एकेका द्वारासंबंधाने चिठ्ठी टाकली.


हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.


ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.


जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.


यहूदी, बन्यामिनी, एफ्राइमी व मनश्शे ह्यांच्यापैकी जे यरुशलेमेत राहण्यास आले ते हे :


मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावीत.


पवित्र नगरातले सर्व लेवी दोनशे चौर्‍याऐंशी होते.


त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्‍हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.”


कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.


यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.


पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.


ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.


मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;


मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू,


मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.


शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश


Lean sinn:

Sanasan


Sanasan