Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 10:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 इस्राएल लोक व लेव्यांचे वंशज ह्यांनी धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्रस्थानाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठड्यांत आणावे; आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 10:39
12 Iomraidhean Croise  

त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”


मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधल्या.


लोक अर्पणे, दशमांश व वाहिलेल्या वस्तू प्रामाणिकपणे आणून पोचवू लागले; त्यांचा मुख्य अधिकारी कोनन्या नावाचा एक लेवी असून त्याचा दुय्यम त्याचा भाऊ शिमी हा होता.


जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.


परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.


“तू लेव्यांना सांग की, मी इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हांला नेमून दिले आहेत, ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा.


तू लेव्यांना सांग की, जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल, तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल.


आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश, आपली गुरेढोरे अथवा शेरडेमेढरे ह्यांचे प्रथमवत्स, नवसफेडीची वस्तू अथवा स्वसंतोषाची अर्पणे व स्वहस्ते समर्पित करायचे आपले अर्पण ही आपल्या वेशीच्या आत तुम्ही खाऊ नयेत;


आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan