Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 10:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ह्याशिवाय आम्ही असा एक नियम करून ठेवतो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी एक तृतीयांश शेकेल दर वर्षी द्यावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 10:32
12 Iomraidhean Croise  

हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”


लढाईत जी लूट त्यांना मिळत असे तिच्यापैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत.


त्या दिवसांत यहूदात काही लोक शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादत; त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ ह्यांचे बोजे शब्बाथ दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली त्याच दिवशी त्यांची मी कानउघाडणी केली.


तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आमच्यावर व ह्या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र न मानून इस्राएलावर आणखी अरिष्ट आणायला पाहता.”


तेव्हा मी त्यांना दरडावून म्हटले, “तुम्ही कोटासमोर का उतरलात? पुन्हा असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकीन.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.


तसेच मी, माझे बांधव व माझे सेवक असे आम्ही त्यांना पैसा व धान्य वाढीदिढीने देतो; आपण हा वाढीदिढीचा व्यवहार सोडला पाहिजे.


तू त्यांना आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला, आणि तुझा सेवक मोशे ह्याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम व नियमशास्त्र ही विहित केली.


पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan