नहेम्या 10:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्या देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू अथवा अन्नसामग्री विकण्यास आणली, तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही; सातव्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “शेजारील देशात असणार्या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू. Faic an caibideil |