नहेम्या 10:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला. Faic an caibideil |
तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होतेस की, ‘तू माझ्यासमोर वागत आलास त्याचप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची काळजी बाळगून माझ्या नियमांनुसार चालतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटणार नाही.’ त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर.