Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्यांनी आपली मोहर केली ते हेच : हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 या करारावर सही करणाऱ्यांची नावे: राज्यपाल: हखल्याहचा पुत्र नहेम्याह. सिद्कीयाह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 10:1
11 Iomraidhean Croise  

मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.


तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या मसलतीचा ज्यांना धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावतो, असा करार आपल्या देवाशी करू या; हे सर्व आपण नियमशास्त्राप्रमाणे करू या.


तिर्शाथा1 त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्‍या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.”


हखल्याचा पुत्र नहेम्या ह्याचा वृत्तान्त : विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो,


सराया, अजर्‍या, यिर्मया,


आम्ही आमच्या मुली ह्या देशातल्या लोकांना देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलांना करणार नाही;


तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.”


पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी ह्या कार्यास मदत केली. तिर्शाथाने एक हजार दारिक1 सोने, पन्नास कटोरे व पाचशे तीस याजकीय वस्त्रे एवढी भांडारात जमा केली.


मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते.


ह्या सर्व कारणांस्तव आम्ही दृढ करार करतो व लिहून देतो, आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याच्यावर मोहर करीत आहेत.


मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan