Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहूदातून आले; बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहूदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरूशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 1:2
12 Iomraidhean Croise  

सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.


त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर व लोहार ह्यांना कैद करून नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही.


देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.


तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणार्‍या ह्या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हांला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार?


तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


तुमच्यापैकी निभावलेले ज्या राष्ट्रांत पकडून नेले जातील त्यांत ते माझे स्मरण करतील; तेव्हा माझ्यापासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणीन; त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले, त्यामुळे ते आपणांस निंद्य मानतील.


त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्‍यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan