Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 3:7
12 Iomraidhean Croise  

तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील?


ह्याकरता सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी अश्शूराच्या राजाचा समाचार घेतला तसा बाबेलच्या राजाचा व त्याच्या देशाचा समाचार घेईन.


आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.


‘पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील’ असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्राएल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले.


ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan