Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्‍या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 3:3
10 Iomraidhean Croise  

देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


तू इस्राएलाच्या पर्वतांवर पडशील; तू, तुझे सर्व सेनासमूह आणि तुझ्याबरोबर असलेले लोकसमूह, हे तुम्ही सगळे पडाल; मी तुम्हांला नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांना व वनपशूंना भक्ष म्हणून खाण्यासाठी देईन.


कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही.


रस्त्यांतून रथ बेफाम चालले आहेत, सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत, ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहेत.


तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan