Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तरी ती हद्दपार झाली, तिला बंदिवान करून नेण्यात आले; तिची मुले रस्त्यांच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली; तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व महाजनांना साखळ्यांनी बांधण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्‍यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 3:10
17 Iomraidhean Croise  

हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” त्याने म्हटले, “तू इस्राएल लोकांना उपद्रव देणार; त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वधणार; त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार; त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार; हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून.”


तुम्ही तर पोरक्यावर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांचा क्रयविक्रय करण्यास चुकत नाही.


हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!


जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य!


त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात.


त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


मी मिसर्‍यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन; एक उग्र राजा त्यांच्यावर सत्ता करील असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.


त्यांनी तुला हातांनी धरले तेव्हा तू चिडून त्या सर्वांचे खांदे फोडून टाकलेस; ते तुझ्यावर टेकले असता तू मोडून गेलास व तू सर्वांच्या कंबरा खचवल्यास.


शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.


त्यांनी माझे लोक पणाला लावले, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस पिण्यासाठी त्यांनी मुलगी विकली.


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशीयांनी त्याच्या वेशीत शिरून यरुशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यांतला एक होतास.


Lean sinn:

Sanasan


Sanasan