Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 रक्तपाती नगरीला धिक्कार असो! कपट व खून ह्यांनी ती भरली आहे, तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो! ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे; तिच्यात नेहमी बळी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो, लबाड्यांनी गच्च भरलेली, लूटमाऱ्यांनी भरलेली, कधीही पीडितांशिवाय नसणारी!

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 3:1
11 Iomraidhean Croise  

जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.


याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्राएलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे नियमशास्त्र ते ऐकेनात;


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरत असे.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो त्याला धिक्कार असो!


Lean sinn:

Sanasan


Sanasan