Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती; तरी आता ते पळून जात आहेत; ते “थांबा हो थांबा,” असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे, पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत. दुसरे किंचाळतात, थांबा! थांबा, परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे जिचे पाणी गळून चालले आहे. “थांबा, थांबा,” ते ओरडतात, पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 2:8
15 Iomraidhean Croise  

त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;


हुसकलेला हरिण, मेंढपाळावाचून मेंढरांचा कळप, ह्यांसारखे ते होतील; प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल; प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल.


निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.


तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडेसुद्धा पाहायचे नाहीत.


बाबेलातला पेरणारा, कापणीच्या वेळी विळा चालवणारा नाहीसा करा; जोरदार तलवारीपुढे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळेल, प्रत्येक जण स्वदेशाकडे धाव घेईल.


हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


तुझे सरदार झुंडींनी येणार्‍या टोळांसारखे आहेत, तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत; ते थंडीच्या दिवसांत कुंपणात तळ देतात व सूर्योदय होताच पळून जातात; ते कोठे गेले ते कोणास कळत नाही.


नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो;


आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan