Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 2:2
14 Iomraidhean Croise  

त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला)


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


कारण पाहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणतो, तर तुम्ही अगदी शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हांला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मारण्यासाठी मी तलवार बोलावत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.’


मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.


द्राक्षे गोळा करणारे तुझ्याकडे आले म्हणजे ते काही सरवा राहू देणार नाहीत; रात्री चोर आले तर त्यांना हवे तितके मिळेतोवर ते नासधूस करतील.


तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलवंशज ज्या राष्ट्रांत गेले आहेत त्यांतून मी त्यांना काढून व चोहोंकडून गोळा करून स्वदेशी नेईन;


ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणांला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी1 पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.


वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव; तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर, पायांनी गारा तुडव, विटाळे हाती घे.


ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan