Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 2:10
24 Iomraidhean Croise  

आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.


मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


कोणा पुरुषास प्रसववेदना होत आहेत की काय, हे विचारा; पाहा, प्रत्येक पुरुष प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे कंबरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे असे माझ्या दृष्टीस का पडत आहे?


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू ह्या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.’


माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुतकी आहे; महाभयाने मला घेरले आहे.


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी तो अधोलोकी गेला त्या दिवशी मी विलाप करवला; त्याच्यासाठी मी जलनिधी झाकला, त्याचे प्रवाह बंद केले, महाजले रोखली; त्याच्यासाठी मी लबानोनास काळेठिक्कर केले. त्याच्यासाठी वनातले सर्व वृक्ष म्लानवदन झाले.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


त्यांच्यापुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंडतात.


कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे.


आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?


“मी राष्ट्रे नष्ट केली आहेत, त्यांचे बुरूज उद्ध्वस्त केले आहेत; मी त्यांचे रस्ते उजाड केले आहेत, तेथून कोणी जात-येत नाही; त्यांची नगरे उद्ध्वस्त केली आहेत, कोणी माणूस, कोणी रहिवासी तेथे उरला नाही.


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan