Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे; कोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर, आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तो तुला आदळून तुकडे करण्यासाठी तुझ्याविरूद्ध आला आहे. शहरातील कोटांचे रक्षण कर, रस्त्यावर नजर ठेव, स्वतःला बळकट कर, तुझ्या सैन्याला एकत्र कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे. आपल्या गडांवर पहारा दे, मार्गांची रखवाली कर, मोर्चा बांध, आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर!

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 2:1
14 Iomraidhean Croise  

पण तू जाणारच तर मर्दुमकी कर; युद्ध करण्याची हिंमत बांध. देव तुला आपल्या शत्रूपुढे चीत करील; साहाय्य करण्याचे व चीत करण्याचे देवाला सामर्थ्य आहे.”


देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड;


तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.


अरीएलावर उठलेल्या सर्व राष्ट्रांचा समुदाय, अरीएल व त्याचा दुर्ग ह्यांवर हल्ला करून त्याला पीडा देणारे सगळे स्वप्नासारखे रात्रीच्या आभासासारखे होतील.


कोणी भुकेला स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच; कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो मूर्च्छित व तहानेने व्याकूळ झालेला; तशीच सीयोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल.


जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan