Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वराविषयी तुम्हांला काय वाटते?1 तो पुरापुरा अंत करील; विपत्ती दुसर्‍यांदा येणे नकोच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात त्याचा ते अंत करतील; ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 1:9
17 Iomraidhean Croise  

यवाबाच्या हाती असलेल्या तलवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही; त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली; त्याने त्याला पुन्हा वार केला नाही; तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला, मग यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग केला.


कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही,


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


आता हेटाळणी करू नका, नाहीतर तुमच्या बेड्या जास्त आवळतील; कारण सर्व भूमीवर निश्‍चयाने येणारा जो भयंकर नाश त्याविषयी प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून मी ऐकले आहे.


असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.


तेव्हा सर्व मानवजातीला समजेल की मी परमेश्वराने आपली तलवार म्यानातून उपसली आहे; ती पुन्हा त्यात परत जाणार नाही.


प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, विपत्ती, अपूर्व विपत्ती येत आहे.


मी त्यांना शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.


परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे.


तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो;


तेव्हा अबीशय दाविदाला म्हणाला, “देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे; तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल; भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही.”


एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan