Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत; याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात. ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 1:3
33 Iomraidhean Croise  

तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.


त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्‍चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.


मी पाप केले तर ते ध्यानात ठेवून माझ्या अधर्माची तू मला माफी करणार नाहीस;


तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला,


तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे; त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?


परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.


आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस,


परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.


आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


कारण ते वार्‍याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात; त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील.


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’


येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही ‘मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले’ व ‘आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”’


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan