Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर म्हणतो, “ते मजबूत व असंख्य असले, तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाहीतसे होतील. मी तुला पिडले, पण आता पुढे पिडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेह असे म्हणतात: “यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत, तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल. हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले, तरी आता मी तुला पीडा देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 1:12
20 Iomraidhean Croise  

त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील; तू इतःपर कधी शोक करणार नाहीस; तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझ्यावर कृपा करीलच; तो ऐकताच तो तुला पावेल.


“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


त्या नदीपलीकडल्या देशातील भाड्याच्या वस्तर्‍याने, म्हणजे अश्शूरच्या राजाच्या योगाने, प्रभू डोक्याचे व पायांचे केस मुंडील; तो वस्तरा दाढीही काढून टाकील.


त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”


तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.


परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan