Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 त्याने त्यांना उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे, तरीदेखील मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावीत व त्याचा अव्हेर केला जावा, असे त्याच्याविषयी लिहिले आहे, त्याचा अर्थ काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 9:12
30 Iomraidhean Croise  

हे देवा, ऊठ, तू स्वतःच आपला वाद चालव; मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण.


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


मी मारणार्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्‍यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही.


ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्‍यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),


परमेश्वर मला म्हणाला, “त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले ते कुंभारापुढे1 फेकून दे.” तेव्हा ते तीस रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”


तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.”


मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”


“पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील;


तथापि मी तुम्हांला सांगतो, एलीया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”


कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.”


आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील;


आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले.


वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.”


मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”


तुम्ही ‘बांधकाम करणार्‍यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan