Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 8:2
23 Iomraidhean Croise  

त्याने पाहिले तो निखार्‍यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला.


जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.


सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.


परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.


तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील; आमचे अपराध पायांखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील.


मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले.


तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.


तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.


तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”


परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”


तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले.


येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.


मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”


ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”


मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.


तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वत: दुर्बलतेने वेष्टलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan