Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 7:22
26 Iomraidhean Croise  

तरीपण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करण्यास वकील पाठवले, तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले.


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे.


शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते.


बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.


दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नकोस. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नकोस;


मूर्खाचा विचार पापरूप असतो; निंदकाचा लोकांना वीट येतो.


कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही.


दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही.


ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा, आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे, हे समजावे म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लावले.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’


पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!


कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात;


ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”


तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो;


लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस; आपल्या दरिद्री बांधवांकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे केले तर तुला पाप लागेल.


तुझ्यातला जो पुरुष कोमल हृदयाचा व अत्यंत नाजूक प्रकृतीचा असेल तोही आपल्या भावाकडे, प्राणप्रियेकडे व आपली वाचलेली अपत्ये ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील.


तसेच तुझ्यातील एखादी स्त्री इतकी कोमल व नाजूक असेल, की ती आपल्या कोमलपणामुळे व नाजुकपणामुळे जमिनीला आपले तळपाय लावण्याचे धैर्य करणार नाही; तीदेखील आपला प्राणप्रिय पती, पुत्र व कन्या;


कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan