Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 6:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 6:21
15 Iomraidhean Croise  

याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.


तिसर्‍या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांना मेजवानी दिली, आणि त्याने आपल्या प्यालेबरदारांचा नायक व आचार्‍यांचा नायक ह्यांना पुढे आणले.


मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.


अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला.


आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले; त्याने आपला हात निंदकांच्या हातात घातला.


तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;


दुसर्‍या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्‍यांना पीडा दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan