Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 5:7
29 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?”


एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”


तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”’


तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”


तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?”


तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”


तथापि तो उगाच राहिला; त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, “धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?”


जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.”


येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला;


कारण तो त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ.”


तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल;


“अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”


तुम्ही तर आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.


तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”


येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.


ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.”


तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहूदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हांला शपथ घालतो.”


मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”


शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.


ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,


‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’


एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.


म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan