Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 4:19
28 Iomraidhean Croise  

धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.


माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?


काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.


तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे.


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात,


प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस;


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.


कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.


कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.


कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील.


ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan