Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 3:7
20 Iomraidhean Croise  

जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्‍यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.


पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले;


आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली.


मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.


मग तो सबंध गालीलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करत व भुते काढत फिरला.


पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.


मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना.


पुन्हा तो समुद्रकिनार्‍यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते.


तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्‍या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.”


त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.


येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्‍यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता;


कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय?


त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”


नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.


नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan